
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये गुरुवारपासून अॅडलेड येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. यावेळी कसोटीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, नेहमी आशावादी राहणारा… कोणतेही चॅलेंज स्वीकारणारा… आक्रमक बाणा बाळगणारा … अशा नव्या हिंदुस्थानचे मी प्रतिनिधित्व करतोय.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीबाबत आपले मत व्यक्त केले होते. विराट कोहलीचा स्वभाव, आक्रमक वृत्ती ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंसारखी आहे, असे ते म्हणाले होते. विराट कोहलीने ग्रेग चॅपेल यांच्या वक्तव्यावर गुरुवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त दिली. विराट कोहली पुढे म्हणाला, माझी मानसिकता ऑस्ट्रेलियन्ससारखी नाहीए. अगदी पहिल्या दिवसापासूनच माझे व्यक्तिमत्त्व हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करीत आहे.



























































