लॉक डाऊननंतर क्रिकेटपटू उतरले मैदानावर ;इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा सराव सुरू

941

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे तब्बल अडीच महिन्यांपासून बंद पडलेले क्रिकेट आता पूर्वपदावर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इंग्लंड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या तीन देशांच्या क्रिकेटपटूंनी सोमवारपासून सरावाला प्रारंभ केला आहे. लॉक डाऊनच्या काळात आम्ही शारीरिक फिटनेसबरोबरच मानसिक फिटनेसवरही जोर दिलेला होता. त्यामुळे अडीच महिन्यांनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरल्याने खूपच ताजेतवाने वाटत असल्याच्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया खुपच बोलक्या होत्या.

इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने 55 खेळाडूंना मैदानावर सराव करण्यास परवानगी दिली आहे. इंग्लंड-वेस्ट इंडीज दरम्यान 8 जुलैपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व आयर्लंड या देशांविरुद्धही मालिका खेळणार आहे. इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेट एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

श्रीलंकेच्या 13 क्रिकेटपटूंना 12 दिवस सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह इतरही नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. सोमवारचा दिवस हॉटेलवरच फिटनेस सेशनमध्ये गेला. प्रत्यक्ष मैदानावरील सरावाला मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. श्रीलंकेला जुन-जुलैमध्ये दक्षिण आप्रिâका आणि हिंदुस्थान या दोन देशांबरोबर 3-3 वन डे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट सत्र 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दौर्‍यावर येणार्‍या झिम्बाब्वे संघाविरुद्ध टी-20 मालिकेने ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा क्रिकेटला प्रारंभ करणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तान व हिंदुस्थानविरुद्ध टी-20 मालिका रंगणार आहे. सिडनीच्या ऑलिाम्पिक पार्वै स्टेडियमवर स्टीव्हन स्मिथ, डोव्हिड वॉर्नर या फलंदाजांसह वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्वैने कसून सराव केला. सरावाच्या वेळी मैदानावर प्रेक्षकांना यायला परवानगी नव्हती.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने `टीम इंडिया’च्या सराव शिबिरासाठी तयारी सुरु केली आहे. राज्याअंतर्गत विमानसेवा सुरू झाल्याने आम्ही आधी समिक्षा करु. क्रिकेटपटूसाठी शंभर टक्के सुरक्षित वातावरण कोठे आहे, याचा अभ्यास करूनच सराव शिबिर सुरु केले जाईल. राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंना वेगवेगळ्या राज्यांतून यायचे आहे. कोरोनाची परिास्थिती नियंत्रणात येईपर्यंत सर्व खेळाडूंना आपापल्या राज्यातच सराव करण्यास सांगितले आहे. – अरुण धुमल (खजिनदार, बीसीसीआय)

आपली प्रतिक्रिया द्या