विजय हजारे ट्रॉफी, पंजाबपुढे महाराष्ट्राचा खुर्दा

409

महाराष्ट्र क्रिकेट संघाचा विजय हजारे ट्रॉफीतील एलीट ‘बी’ ग्रुपमधील लढतीत पंजाबपुढे अवघ्या 65 धावांत खुर्दा उडाला. प्रतिस्पर्धी गोलंदाजीपुढे महाराष्ट्राचे फलंदाज केवळ 27.2 षटकांत गारद झाले. महाराष्ट्राचा वरिष्ठ संघ आणि 19 वर्षांखालील संघाची वर्तमानकाळातील दुर्दशा बघता महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची (एमसीए) संघनिवड समिती करते तरी काय? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय. महाराष्ट्राच्या फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्करली. महाराष्ट्राकडूत ऋतुराज गायकवाड (14) व नौशाद शेख (22) हेच फक्त दुहेरी धावा करणारे फलंदाज ठरले.

‘एमसीए’ला जाब विचारण्याची वेळ

विजय हजारे ट्रॉफीतील एलीट ‘बी’ ग्रुपमध्ये महाराष्ट्राचा 5 पैकी 3 लढतींत पराभव झालाय. दुसरीकडे 19 वर्षांखालील विनू मंकड क्रिकेट स्पर्धेतही महाराष्ट्राला लागोपाठ सहा लढतींमध्ये हार पत्करावी लागली. ‘एमसीए’ची संघनिवड समिती खेळाडूंची कुठली कामगिरी ग्राह्य धरून महाराष्ट्राच्या विविध संघांची निवड करते याबाबत जाब विचारण्याची वेळ आता आली आहे एवढे नक्की.

आपली प्रतिक्रिया द्या