शार्दूल ठाकूर अडकला लग्न बंधनात, मराठमोळ्या प्रेयसीसोबत घेतली सप्तपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर विवाह बंधनात अडकला आहे. शार्दूल याने मराठमोळ्या मिताली परुळकर हिच्यासोबत सप्तपदी घेतली. पालघरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. शार्दूल आणि मिताली यांच्या लग्नाचे फोटो आता समोर आले आहेत.

 

शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर यांचा नोव्हेंबर 2021 मध्ये साखरपुडा झाला होता. 15 महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला.