लेहमध्ये पत्रकारांना लाच; भाजप नेत्यावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लेह

लेह शहरातील पत्रकाराला लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप नेते व विधिमंडळातील आमदार विक्रम रंधवा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, मात्र रंधवा यांनी  आपल्यावरील आरोप तथ्यहीन असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत असल्याचा दावा केला आहे. रंधवा हे भाजपचे लेह प्रभारी आहेत.

शनिवारी लेह प्रेस क्लबने भाजप आपल्या सदस्यांना पैसे भरलेली पाकिटे देऊन लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला होता. प्रेस क्लबने सोशल मीडियावर यासंदर्भात पत्रही प्रसिद्ध केले, मात्र सदर पाकिटात पैसे नव्हे तर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्याची निमंत्रणपत्रके होती असा रंधवा यांनी दावा केला.