डॉलरऐवजी दिले कागदाचे तुकडे; 3 लाखांची केली फसवणूक

crime

स्वस्तात डॉलर देतो असे सांगून फसवणूक करणाऱया दोघांच्या खार पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मोहम्मद हजरत अबुबकर शेख आणि शाहबुद्दीन मोहम्मद सलीम शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते खार परिसरात राहतात. ऑगस्ट महिन्यात ते बॅण्ड स्टॅण्ड येथे बसले होते तेव्हा अमन नावाचा मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने सुटय़ा पैशांचा बहाणा करून 20 डॉलरची नोट तक्रारदारांना दिली. सुटे पैसे झाल्यावर फोन करा असे तक्रारदारांना सांगून अमन निघून गेला. दुसऱया दिवशी सुटे पैसे घेऊन तक्रारदार हे कुर्ला रेल्वे स्थानक फाटक परिसरात गेले तेव्हा अमन त्यांच्याकडे गेला व त्याने डॉलर असलेले बंडल तक्रारदारांना दाखवले. त्यानंतर आणखी एकजण त्यांच्याकडे आला. आता जो मुलगा आला होता तो विसरभोळा आहे. त्याच्याकडे खूप डॉलर आहेत.

3 लाख रुपये दिल्यास ते डॉलर देऊ असे तक्रारदारांना सांगितले. पैशांची व्यवस्था करतो असे सांगून तक्रारदार तेथूने निघून गेले. स्वस्त डॉलरच्या मोहात तक्रारदार तीन लाख रुपये घेऊन अमनला भेटण्यासाठी कुर्ला रेल्वे फाटक येथे गेले. अमनने तक्रारदारांना घाईघाईत डॉलर असलेले बंडल दाखवले. त्यानंतर अमन तेथून निघून गेला. तक्रारदार घरी आले व त्यांनी ते बंडल उघडून पाहिले तेव्हा त्यात डॉलरऐवजी कागद होते.

आपली प्रतिक्रिया द्या