
राजस्थानच्या नागोर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत जे केले ते भयंकर होते. याप्रकरणी महिलेसह तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
नागोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खरंतर रेखाचा पती विक्रम सिंहसोबत झोपडीच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती फार हलाखीची आहे. मात्र रेख ऐशोआरामाचे आयुष्य जगू इच्छित होती. तिचा पती एका मार्बल कंपनीत मार्बल कापण्याचे काम करत असून तो तिची स्वप्न पूर्ण करु शकत नव्हता. त्यामुळे ती वैतागली होती. त्यानंतर रेखाने सौंदर्याचा उपयोग करुन पैसे कमवायचे ठरवले. तीन वर्षापूर्वी ती मार्बल व्यावसायिकाच्या संपर्कात आली. हळूहळू तिने व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्य़ात ओढले. या कटात रेखाचा मित्र शैतान सिंहने तिची साथ दिली. त्यानंतर लैंगीक संबंध बनवताना तिने व्हिडीओ शूट केला आणि शैतान सिंहकडून ब्लॅकमेल करायला लागली. व्यापाऱ्याला धक्काच बसला, त्याने घाबरुन आधी 23 लाख रुपये दिले, त्यानंतरही रेखाचे लालची स्वभाव मध्ये आला आणि तिने पुन्हा व्यापाऱ्या़डे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र आता तिच्या सततच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून व्यापाऱ्याला आत्महत्या करण्याचा रस्ता निवडला.
22 एप्रिल रोजी बुल्डको येथील ढाणी निवासी मार्बल व्यापारी घरात काही न सांगता घरातून निघाले. 23 एप्रिलला नातेवाईकांनी पोलीस स्थानकात व्यापारी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, व्यापारी भेटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर आली. व्यापारी आत्महत्या करण्यासाठी जात होता. पण त्याआधी व्यापाऱ्याने आपल्या बहिणीला याबाबत सांगितले होते. त्यानंतर दोघे भाऊ-बहिण पोलीस स्थानकात पोहोचले. तिथे तक्रारदाराने महिला आणि तिच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल केलरत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रेखा तिचा मित्र शषैतान सिंह आणि पती विक्रम सिंह याला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.






























































