
दहशत पसरवण्यासाठी कोयता बाळगणाऱ्यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. प्रदीप उर्फ बाबा आनंद गवळी (वय 32, रा. नानापेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातंर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रसाद उर्फ मंक्या शेषराव सातपुते (वय 19, रा. आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याशिवाय कात्रजमधील जांभुळवाडी रस्त्यावर आलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली. विशाल उर्फ गोरख सोनावणे असे अटक केलेल्याचे नाव आहे. तो जांभुळवाडी रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विजय कांबळे आणि हनुमंत शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, एपीआय संदीप बुवा, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, संजय भापकर, रवींद्र फुलपगारे, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, अमर पवार, हनुमंत कांदे, पिराजी बेले यांनी केली.





























































