
तमिळनाडूमध्ये एक अट्टल गुन्हेगार भाजपमध्ये सामील होत होता. तो एका भाजपच्या कार्यक्रमातही हजर होता. पण तिथे पोलिसांना पाहताच या गुन्हेगाराने धूम ठोकली आहे. सुर्या असे या गुन्हेगाराचे नाव असून तो चेन्नईतला मोस्ट वॉटेंड गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड सुर्याला रेड हिल्स नावाने ओळखले जाते. सुर्यावर 6 खुनांचा आरोप आहे. तसेच खुनाचा प्रयत्न, स्फोटकांचा वापर सारख्या गंभीर गुन्ह्यांसह त्याच्या नावावर 50 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. चेन्नईमध्ये भाजपच्या सदस्यत्व घेण्याचा एक कार्यक्रम होता. तिथे सुर्या पोहोचला आणि तो पक्षाचे सदस्यपदही घेणार होता. पण पोलिसांना याची खबर मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांना पाहून सुर्याने पळ काढला. पोलिसांनी या ठिकाणहून 6 जणांना अटक केली. सुर्याच्या साथीदारांना अटक केली म्हणून भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातला आणि सुर्याच्या साथीदारांना सोडण्याची मागणी केली.






















































