नगरमध्ये चार लाख हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे

412

नगर जिल्हा प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे केले जात असून या क्षेत्रात वाढ होत आहे. सोमवारपर्यंत प्रशासनाने जवळपास 4 लाख 21 हजार 384 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, कृषी सहायकांचे दौरे सुरू आहेत. गावात जाऊन नुकसानग्रस्त पिके, फळबागांची पाहणी करून पंचनामे केले जात आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी आहे. तरीदेखील पंचनामे केले जात आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या व अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत 4 लाख 21 हजार 384 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये अकोले 28 हजार 389 हेक्टर, शेवगाव 40 हजार 404 हेक्टर, राहाता 22 हजार 131 हेक्टर, संगमनेर 31 हजार 939 हेक्टर, पारनेर 22 हजार 216 हेक्टर, जामखेड 4 हजार 561 हेक्टर, नेवासे 45 हजार 222 हेक्टर, श्रीरामपूर 28 हजार 548 हेक्टर, नगर 18 हजार 116 हेक्टर, पाथर्डी 59 हजार 292 हेक्टर, श्रीगोंदे 31 हजार 648 हेक्टर, कर्जत 25 हजार 111 हेक्टर, राहुरी 29 हजार 429 हेक्टर, कोपरगाव 34 हजार 275 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रशासनाने केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या