
सामना प्रतिनिधी । कोपरगांव
ऊसशेती फायद्याची करण्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्यांने आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकावर भर दिला पाहिजे, अवर्षण परिस्थीतीत खोडवा पिकाचे व्यवस्थापन करण्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या वतींने देण्यांत आलेल्या प्रत्येक बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रीत करावे, त्यातून हमखास उस उत्पादनांत वाढ होते, असे प्रतिपादन कृषिशास्त्रज्ञ पी. व्ही. घोडके यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी शेतकरी सभासदांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटच्या सहकार्याने खोडवा उस उत्पादन वाढ मार्गदर्शनपर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन वेळापूर, देर्डे कोऱ्हाळे, सत्सगांव, खिर्डीगणेश फार्महाउस येथे केले त्याचे उदघाटन वेळापूर येथे उपाध्यक्ष संजय होन यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर यांनी प्रास्तविकात या कृतीसत्राचे उद्देश स्पष्ट करत कारखान्यांने सभासद शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या उपाय योजनांची माहिती देवुन हुमणी अळी उच्चाटनांसाठी असलेल्या प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. कोल्हे कारखान्यांचे संचालक राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, सोपानराव पानगव्हाणे, मोहनराव वाबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालक सर्वश्री अरूणराव येवले, अशोक भाकरे, मनेष गाडे, भास्करराव तिरसे, माधवराव गोरे, शिवाजीराव कदम, रामनाथ चिने, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे ऊस शास्त्रज्ञ पी. पी. शिंदे म्हणाले की, शाश्वत आर्थिक स्थैर्यासाठी ऊस पीकच अत्यंत महत्वाचे आहे मात्र त्याकडे लागवडीपासून ते वाढीपर्यंत बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले की, उस उत्पादन लागवड व वाढ यासाठी केलेल्या उपाययोजना प्रभावी आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. राज्यात 10 लाख हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असून त्यातील अडीच लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. ठिबकच्या प्रभावी वापरांने शेतकऱ्यांनी 152 मे. टनापर्यंत उस उत्पादन घेवून विक्रम केले आहेत. चालु वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यांने खोडवा उस पीक व्यवस्थापनांवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. शेतात असलेल्या पाचटाची कुटटी करून व्हीएसआयने उत्पादित केलेली द्रवरूप व जीवाणू खते, वसंत उर्जा यांचा प्रभावी वापर केला पाहिजे. उस पीकाच्या गरजेनुसार खताची मात्रा द्या, आपण करीत असलेले उस लागवडीचे प्रयोग अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यातून जनजागृती करा, विभागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या चर्चेतुन नाविन्यपुर्ण माहितींचे अदान प्रदान करा, तुम्हाला उत्पन्नाची किती पातळी गाठायची हे ध्येय निश्चित करा, जगात ब्राझील देश साखर उत्पादनांत पहिल्या क्रमांकावर आहे तेथे 80 टक्के उस उत्पादन हे खोडव्यापासून घेतले जाते, त्याच धर्तीवर आपल्या देशात व राज्यात उसाचे खोडवे वाढविले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी झेबा युपीएल जलसंचय उत्पादनाविषयी माहिती देवून शेतकऱ्यांना त्याचे प्रात्याक्षिक दाखविले. ट्रॅक्टरच्या सहायांने आधूनिक शेती व उस व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यांत आली. शेवटी उपाध्यक्ष संजय होन यांनी आभार मानले.































































