
मागील आठवड्यापासून जिल्ह्यात जोरदार परतीचा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसाने झाले.या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना आपण अधिकार्यांना दिल्या आहेत. अशी माहिती भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. तसेच 30 तारखेपासून पंचनामे करण्याच्या कामास सुरूवात होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात परतीच्या मोठ्या स्वरूपात झालेल्या पावसाने सोयाबीन कांदा बाजरी कापूस तसेच नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. मागील दुष्काळी परिस्थितीचे संकट दूर करण्याची संधी शेतकर्यांना यावर्षी आली होती. अर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी हाताशी आलेले पीक हाच शेतकर्यांना आधार होता.पण या पावसाने झालेल्या नूकसानीचे भयानक चित्र हे वेदनादायी असून, या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी महसूल व कृषी विभागातील अधिकार्यांशी चर्चा करून झालेल्या नूकसानीची माहिती घेतली. पावसामुळे हाती आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्याची गरज आहे. विखे यांनी सांगितले की शेतातच मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने शेत जमीन वाहून गेल्याचे संकटही काही ठिकाणी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
यावर्षी उशिरा झालेल्या पावसाने खरीप हंगामाला थोडासा दिलासा दिलासा मिळाला. उपलब्ध पाण्यावर शेतकर्यांनी पीक जगवण्याचे प्रयत्न सूरू असतानाच परतीच्या पावसाने पीक जमीनदोस्त झाली असून शेतकर्यांना नैसर्गिक संकटाबरोबरच अर्थिक संकटालाही सामोरे जावे लागले आहे. या संकटातून शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नूकसानीची माहीती समोर येणे गरजेचे असल्याने कृषि व महसूल विभागाने या नूकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव तयार करण्याबाबत आपण अधिकार्यांना सांगितले असल्याचे विखे यांनी सांगितले.


























































