गडचिरोलीत एसआरपीएफच्या 29 जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

358

गडचिरोलीत पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या आणि धुळे येथून आलेल्या 150 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांपैकी 29 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. ही 150 जवानांची तुकडी गेल्या आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीत दाखल झाली होती. त्यातील 29 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव तर इतर सर्व जवानांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे 72, राज्य राखीव दलाचे 29, सीमा सुरक्षा दलाचे 2 असे एकूण 103 जवान कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या