Pulwama Attack – महाराष्ट्रातील 2 जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघाती हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. संजय राजपूत असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून ते बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. राजपूत यांच्याशिवाय बुलडाण्याचेच रहिवासी असलेले नितीन राठोड हे देखील या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले आहेत.

बुलढाण्यातील मलकापूरचे रहिवासी असलेले संजय राजपूत हे सीआरपीएफच्या 115 बटालियनचे जवान होते. तर नितीन राठोड हे लोणारजवळच्या चोरपांगरा गावचे रहिवासी होते.  गुरुवारी CRPF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यामध्ये आत्मघाती दहशतवाद्याने 350 किलो स्फोटकं भरलेलेली कार आदळवली होती. यामुळे झालेल्या भीषण स्फोटामध्ये आत्तापर्यंत 42 जवान शहीद झाले आहेत.