
झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाला. जखमी जवानाला उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सारंडा जंगलात अद्याप चकमक सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सारंडा जंगलात सोमवारी नक्षलविरोधी मोहीम सुरू असताना जवानाचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीवर पाय पडल्याने स्फोट झाला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील कोब्रा बटालियनचा एक जवान गंभीर जखमी झाला. मनोज कुमार असे जखमी जवानाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
























































