डबे सोडून बिदर एक्प्रेस पळाली

सीएसएमटी ते बिदर एक्प्रेसचे दोन डबे कपलिंग तुटल्याने एकमेकांपासून विलग झाल्याची घटना बुधवारी रात्री विद्याविहार स्थानकांदरम्यान घडली. दरम्यान, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. बिदर एक्प्रेसचे रात्री 9.35 वा. कुर्ला व विद्याविहारदरम्यान कपलिंग तुटल्याने तिचा इंजिनापासूनचा दुसरा आणि तिसरा कोच वेगळा झाला. या डब्यांना पुन्हा जोडण्यात आल्यानंतर 10 वाजता ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना झाली. कपलिंग नेमके कशामुळे तुटले याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.