कोथिंबीर घेऊन जाणार ट्रक उलटला, नागरिकांचा कोथिंबीर वर डल्ला

सामना ऑनलाईन, हडोळती

उमरगा (रेतू) पाटी जवळ निजामाबाद कडे कोथिंबीर घेऊन जाणारी मालवाहू पिकअप जीप दहा फुट खड्ड्यात उलटली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही मात्र अपघातानंतर नागरिकांनी कोथिंबीरीवर डल्ला मारला.

शिरूर मुखेड रोडवर उमरगा रेतू पाटीजवळ मालवाहू पिकअप  ट्रक पलटी झाला. हा ट्रक चाकूर येथून कोथींबीर घेऊन निजामाबादला जात होता. मुखेड कडून येणार्‍या कारने हुलकावणी दिली. कारला चुकवण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ही गाडी दहा फुट खड्ड्यात पडली,अपघाताच्यावेळी चालक एकटा गाडीत होता. गाडी दोनदा उलटूनही असलमखान शेख हा चालाक तो जखमी झाला नाही. या गाडीमध्ये शंभरच्या वर कोथींबीर चे कॅरेट होते. अपघाताच्या ठिकाणी चोहीकडे कोथिंबीर अस्ताव्यस्त पडलेली दिसत होती व लोक कोथींबीर घेऊन जात होते.

आपली प्रतिक्रिया द्या