Kokan News – कणकवली रेल्वे स्टेशन मधील डासांचा प्रादुर्भाव थांबवा; कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समितीचे स्टेशन मास्तरांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात घाणीचे सामाज्य झाले आहे. त्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे. कणकवली रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बऱ्याचदा नियमित वेळेपेक्षा उशीरा विविध रेल्वे गाड्या येत असतात. त्यावेळी प्रवासी शेडमध्ये बसलेल्या प्रवाशांना , लहान मुलांना, अपंग व्यक्तींना , जेष्ठ नागरिकांना , महिलांना डासांच्या प्रार्दुभावामूळे त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात वाढलेल्या कीटक , डास नियंत्रणासाठी फवारणी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने स्टेशन मास्तरांना करण्यात आली. यावेळी सुरेश सावंत , प्रा. हरिभाऊ भिसे, महानंद चव्हाण ,संजय मालणकर , श्री. सावंत , श्री. परब यांच्यासहल कोकण रेल्वे समन्वय व संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असलेले प्रवासी निवारा शेड अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. सध्या उन्हाळा व पावसाळा हंगाम जवळ येत असल्यामुळे प्रवाशांना ऊन व पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी हे निवारा शेड लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी स्टेशन मास्तर यांनी मागणीबाबत सकारात्मक आश्वासन दिले.