
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
सोन्याच्या बांगड्या खरेदीचा बहाणा करून तीन महिलांनी १ लाख १० हजार रुपये किमंतीच्या तीन सोन्याच्या बांगड्यांचा लंपास केल्या. ही घटना रत्नागिरी शहरातील खेडेकर ज्वेलर्समध्ये घडली.
खेडेकर ज्वेलर्समध्ये तीन महिला खरेदीसाठी आल्या होत्या. दुकानातील कर्मचारी मिनाक्षी गुरव ही त्या महिलांना बांगड्या दाखवत होती. अशावेळी मिनाक्षी गुरवचे लक्ष विचलित करून सहा खणांच्या एका बॉक्समधील प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या बांगड्या त्यांनी लंपास केल्या. या चोरीचा गुन्हा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून मिनाक्षी गुरव हिने फिर्याद दाखल केली आहे.





























































