
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडक कारवाई केली. कारवाई करून उच्च मूल्य असलेले ड्रोन, विदेशी वन्यजीव आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. सीमा शुल्क विभागाने शनिवार आणि रविवारी एकूण पाच कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत हायड्रोपॉनिक गांजा जप्त केला. बँकॉक येथून एक प्रवाशी विमानतळावर आला. त्याने बॅगेत 1.964 किलो गांजा लपवला होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1 कोटी 96 लाख रुपये इतकी आहे. गांजा तस्करी प्रकरणी एका प्रवाशाला अटक केली.