दोन्ही फलंदाजांचे ‘हम साथ साथ है’, स्टॉयनिस झाला विचित्र पद्धतीने धावबाद

सामना ऑनलाईन । लंडन

लंडनच्या प्रसिद्ध लॉर्डस मैदानात यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 285 धावा रचल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस विचित्र पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले. स्टॉयनिस 8 धावांवर धावबाद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 42 व्या षटकात आदिल रशिदच्या गोलंदाजीवर स्मिथने जोराचा फटका मारला. चेंडू सीमारेषेवर गेला. दोन धावा मिळतील या विचाराने स्टॉयनिस आणि स्मिथ जीव तोडून पळाले. परंतु स्मिथने अर्ध्या रस्त्यातून माघार घेतली. याच दरम्यान सीमारेषेवर असणाऱ्या बेअरस्टोने अचूक थ्रो रशिदकडे केला. रशिदनेही वेळ न घेता चेंडू यष्टीरक्षक बटलकडे फेकला आणि त्याने यष्ट्या उडवल्या. इकडे स्थिम आणि स्टॉयनिस एकाच क्रिजमध्ये होते. परंतु स्मिथने आपली क्रिज न सोडल्याने स्टॉयनिसला बाद ठरवण्यात आले. बाद झाल्यानंतर स्टॉयनिसने स्मिथकडे हातवारे करत रागाराग केला.