कोरोनाच्या लढाईत केंद्र – राज्य समन्वय महत्त्वाचे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचे मोठे संकट आहे. या लढाईत केंद्र सरकार आणि राज्य सरकाराचे समन्वय महत्त्वाचे आहे असे मत माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी व्यक्त केले आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या कॉन्फरन्समध्ये सिंह यांनी हे मत व्यक्त केले. तसेच या बैठकीत मजुरांचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

आज काँग्रेस पक्षाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. या चर्चेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे सरकार असलेले मुख्यमंत्री आणि इतर मोठे नेते सामील झाले होते. डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की कोरोनाच्या संकटात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील समन्वय महत्त्वाचे आहे. हे समन्वय जर आपण साधले तर आपण ही लढाई आपण नक्कीच जिंकू. कोरोनाची ही लढाई आपल्याकडील उपलब्ध असलेल्या साधनांवर अवलंबून आहे असेही डॉ. सिंह म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये अनेक राज्यात मजूर आणि विद्यार्थी फसले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसेच केंद्र सरकार यावर काहीच करत नसल्याचे बघेल यांनी म्हटले आहे. तसेच केंद्राकडून राज्याचे 600 कोटी अडकल्याच्चे पाँडिचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी म्हटले आहे.