स्पाइसजेटवर सायबर हल्ला; उड्डाणे प्रभावित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

स्पाइसजेटच्या सिस्टमवर मंगळवारी रात्री सायबर हल्ला झाला. हा रॅन्समवेअर हल्ला होता, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. दरम्यान, सायबर हल्ल्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणे प्रभावित झाली. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. आयटी विभागाच्या टीमने तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर विमानसेवा सुरळीत सुरू झाली.