विमान कंपनीच्या नावाने अभिनेत्रीची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका प्रसिद्ध विमान कंपनीच्या नावाखाली सायबर ठगाने अभिनेत्रीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार या गोरेगाव येथे राहतात. डिसेंबर महिन्यात त्याना एका नंबरवरून पह्न आला. फोन करणाऱ्याने तो विमान कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांचा सतत विमान प्रवास होतो पण त्यांनी विमान कंपनीचे अॅप डाऊनलोड केले नसल्याने त्यांना प्रवास सवलतीचे पॉईंट मिळत नाहीत. असे भासवून अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन त्यांनी ते अॅप्स डाऊनलोड करताच पह्न हँग झाला आणि खात्यातून 98 हजार रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.