
सीरम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं वृत्त आहे. गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर काही वेळापूर्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
सायरस पूनावाला हे पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत. कोरोना काळात त्यांच्या सीरम या संस्थेने लस विकसित करण्यासाठी सुमारे 800 मिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक केली होती. त्यातून कोविशिल्ड ही लस विकसित करण्यात आली होती.




























































