कोळी वाड्यांमध्येच राहणार मासेमारीचे धक्के, पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कोळीवाड्यांमध्ये मासेमारी करणारी गावे, कोळी समाजाच्या सामायिक मालमत्ता, मासेमारीचे धक्के, बर्फाचे कारखाने, मासे सुकविण्याच्या जागा तसेच मंच इत्यादींचा सीझेडएमपी अर्थात महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनमध्ये समावेश करण्याची मागणी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारकडे केली होती. ही मागणी पर्यावरण विभागाने मान्य केली आहे. त्यामुळे कोळी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विकास आराखड्याचा अंतिम मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये कोळी बांधवांसाठी आवश्यक असलेल्या जागांचा नकाशामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. यामुळे लाखो कोळी बांधवांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सीझेडएमपीचा सुधारित आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्र्यांनी दिले.