लातूरमध्ये पुन्हा घरफोडी, लाख रुपये चोरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील सौभाग्यनगर भागातील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड पळवण्यात आली. लातूर शहरातील दुसरी घटना आहे. 26 डिसेंबर रोजी अशाच प्रकारे तीन ठिकाणी घरफोडी झाल्या होत्या.

किशन कंदरफळे हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून एक लाख 10 हजार रुपये चोरले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.