
मोबाईल, कॉम्प्युटरमध्ये अडकलेल्या मुलांनी पुस्तके वाचावीत, त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी दादर पश्चिम येथील दादर सार्वजनिक वाचनालय (दासावा) प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणजे दासावाने सुरू केलेला ‘बालकुमार ज्ञानकोपरा’ उपक्रम. याअंतर्गत मुलांना दिवसभर वाचनालयात बसून विनाशुल्क पुस्तके वाचण्याची सुविधा मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दासावातर्फे उन्हाळी सुट्टीत बालवाचनालय उपक्रम सुरू झाला आहे. ‘ज्ञानकोपरा’चे उद्घाटन नुकतेच संस्थेच्या प्रमुख कार्यवाह शुभा कामथे, कार्याध्यक्ष मनोहर साळवी, ग्रंथपाल अश्विनी फाटक आणि बालवाचकांच्या उपस्थितीत झाला. 10 जूनपर्यंत सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेत मुलांना वाचनालयाचा लाभ घेता येईल.































































