कोरोना संकटात दादरच्या साने गुरुजी शाळेची फी वाढ; पालकांमध्ये संताप

688

कोरोना संकटामुळे सर्व उद्योगधंदे आणि कार्यालय बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच दादर शिवाजीपार्क येथील साने गुरुजी इंग्लिश हायस्कुलने इयत्ता पहिलीची फी वाढ केली आहे. कोरोना काळात फी वाढ करू नये असे शिक्षण विभागाचे आदेश असतानादेखील या शाळेने ही फी वाढ केली आहे. साने गुरुजी शाळेने पहिलीची फी 33,650 वरून थेट 44,850 रुपये इतकी केली आहे. शाळेने केलेल्या या फी वाढीमुळे पालकांमध्ये अत्यंत संतापाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या