दादर ते सावंतवाडी एक्सप्रेस 26 सप्टेंबरपासून धावणार

दादर ते सावंतवाडी एक्स्प्रेस ही विशेष ट्रेन म्हणून 26 सप्टेंबरपासून चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही विशेष ट्रेन संपूर्णपणे आरक्षित असणार असून तिचे आरक्षण 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात 1 जून पासून 200 मेल-एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या. त्यानंतर 12 सप्टेंबरपासून आणखी 20 मेल-एक्सप्रेस चालू करण्यात आल्या. त्यात कोकणात जाणाऱ्य़ा मोजक्या दोन ते तीनच ट्रेन होत्या. आता रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर रेल्वे दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून तिचे मान्सून आणि नॉन-मॉन्सूनचे वळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

मान्सूनचे वेळापत्रक

1) दादरसावंतवाडी रोड विशेष ट्रेन

ट्रेन क्र. 01003 विशेष गाडी दादरहून 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज रात्री 12.05 वा.सुटून सावंतवाडी रोडला दुसऱ्य़ा दिवशी दु.12.20 वा. पोहोचेल.

01004 ही परतीची विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान दररोज सायं. 5.30 वा. सुटेल आणि दुसऱ्य़ा दिवशी दादरला स. 6.45 वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

नॉन-मॉन्सूनचे वेळापत्रक

2) दादर-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन

ट्रेन क्र. 01003 विशेष गाडी दादरहून 1 नोव्हेंबर ते पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज रात्री 12.05 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसऱ्य़ा दिवशी स. 10.40 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्र. 01004 ही परतीची विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून  1नोव्हेंबरपासून ते  पुढील सूचना मिळेपर्यंत दररोज सायं. 6.50 वाजता  सुटेल आणि दुसऱ्य़ा दिवशी दादरला स. 06.45 वाजता पोहोचेल.

आपली प्रतिक्रिया द्या