शहरात रंगणार आज दहीहंडीचा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

कृष्ण जन्मदिनानिमित्त उद्या सोमवारी गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडीचा थरार रंगणार आहे. संभाजीनगरातील गोविंदा पथकेही ‘गोविंदा रे गोपाळा’ आणि ‘एक दोन तीन चार, राजूदादाची पोरं हुशार’ गाण्याच्या ढाकूमाकू ढाकूमाकूच्या तालावर थिरकत थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी आणि मोठे बक्षीस पटकावण्यासाठी सज्ज झाली आहेत.

दयावान दहीहंडी महोत्सव समितीच्या वतीने पुंडलिकनगरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडीचा थरार पहावयास मिळणार आहे. प्रथम विजेत्या संघास २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. आकर्षक बक्षिसांबरोबर सिनेअभिनेता उपेंद्र लिमये महोत्सवाचे आकर्षण असणार असल्याची माहिती दयावान दहीहंडी महोत्सवाचे संस्थापक प्रसाद जैन यांनी दिली.

सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून दहीहंडी महोत्सवास सुरुवात होणार आहे. यंदाचे या महोत्सवाचे पहिले वर्ष आहे. या महोत्सवाला खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, संतोष जेजूरकर, विश्वनाथ स्वामी, मधुकर डिडोरे, व्यापारी संघाचे संजयकुमार कांकरिया, मीना गायके, गजानन मनगटे, आत्माराम पवार, संतोष खेंडके, वामन शिंदे, दिग्विजय शेरखाने, अनिल जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अभिनेता उपेंद्र लिमये हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. सलामी देणाNया प्रत्येक पथकास स्मृतिचिन्ह व रोख, तर प्रथम विजेत्या संघास २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या सोहळ्यात पथकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसाद जैन, अजय गटाणे, वैभव भगत, विशाल गायके, शशांक जैन, सूर्यकांत जायभाये, स्वप्नील मुगदिया, कैलास तिवलकर, पुरुषोत्तम पानपट, सोनू आहिले, सुरेश मोढे, प्रदीप कोरडे, प्रकाश जोरले, बापू कवळे यांनी केले आहे.

संगीताची मेजवानी

रामेश्वर बाबर निर्मित ऑर्केस्ट्रा गीत समृद्धीद्वारे सर्वांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. शिवाय डान्सर भाग्यश्री नगरकर, यशवंत खरोटे यांची उपस्थिती राहणार आहे.

कॅनॉटमध्ये थ्रीडीचा सोहळा

डोळे दीपवणारा प्रत्येक क्षण आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला स्वाभिमानी मानाची सलामी यंदा दिमाखदार सोहळ्यात कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने थ्री डी लईट्स आणि साऊंड सिस्टिमचे खास आकर्षण आहे. १ लाख ११ हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, प्रथम क्रमांकास ५१ हजार, द्वितीय ३१ हजार तर तृतीय क्रमांकास २१ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

मथुरेच्या कलाकारांचा जल्लोष

गांधी चौक सराफा रोड येथे नवसार्वजनिक गणेश मंडळ आणि हुकुमचंद भारुका ट्रस्टच्या वतीने सोमवारी सायंकाळी मथुरा वृंदावनच्या कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडी महोत्सव रंगणार आहे. यानंतर महाप्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असें आवाहन मंडळाचे अध्यक्ष आनंद भारुका, कार्याध्यक्ष वैâलास माने, सचिव लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष रत्नाकर तांदळे, उपेंद्र झवेरी, नरेंद्र अग्रवाल, रेणुकादास पुजारी, गणेश भारुका, प्रेम शिंदे आदींनी केले आहे.

टीव्ही सेंटरवर धर्मरक्षक दहीहंडी सोहळा

शिवसेना संभाजीनगरच्या वतीने टी. व्ही. सेंटर येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकात भव्य दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन आणि युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवणाNया पथकांना शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे. या महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सवाचे आयोजक तथा शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

देवकीनंदन दहीहंडी स्तंभाचे पूजन

शहरातील सर्वात जुनी दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवकीनंदन दहीहंडीच्या स्तंभाचे पूजन आज शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, नगरसेवक सचिन खैरे, वीरभद्र गादगे, देवकीनंदन दहीहंडीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, गोपी घोडेले, परेश धिसे, संदीप लिंगायत, उमेश पहेलवान, गणेश वर्मा, शुभम जैस्वाल, राजू मन्सुरी, एजाजभाई, धीरज पवार, आशिष सरोदे, मनोज जेस्वाल, रोहित कानकाटे, सागर खर्गे, सुरज सुनाले, उमेश भाटिया, जयसिंग होलिये, मनोज पराती, टिनू कच्छवाह, विरेंद्र वर्मा, रोहित आहुजा, संजय महारगुडे, दर्शन लिंगायत, प्रशांत वाघमारे, चिराग गादिया, निखिल चव्हाण, शगुन पाटणी, प्रतीक जैस्वाल, किरण दीपवाल, शिवा पाटील, सुमित शेलार, विशाल कच्छवाह, भूषण इंगळे, अक्षय जैस्वाल, सौरभ यादव, राम पुलंब्रीकर, सागर कुलकर्णी, कुणाल तायडे, आदित्य वर्मा, अर्जुन जाधव, संजय राखुंडे, अक्षय वैद्य, तेजस पहाडिये, सचिन ढोकरट, सचिन पारसवर आदींसह नागरिक उपस्थित होते.