
मराठी विज्ञान परिषदेद्वारे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२५मध्ये दहिसरच्या विद्या मंदिर शाळेच्या अजबाई या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. 4 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी वाशी इथे घेण्यात आली. नागपूरच्या प्रियदर्शनी स्कूलला दुसरा तर नाशिकच्या बिटको गर्ल्स हायस्कूलला तिसरा क्रमांक मिळाला. विद्या मंदिर दहिसर या शाळेने प्रथम क्रमांकासह एकूण सात विभागांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. त्यात उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, अभिनेत्री आणि उत्तेजनार्थ या विभागांचा समावेश आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांना उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक मिळालं.


























































