दहिसर विद्यामंदिरला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात दहिसर विद्या मंदिरचा कबड्डी संघ उपविजेता ठरला. या उज्ज्वल यशाचे मानकरी पुढीलप्रमाणे – कर्णधार साक्षी चाफेकर, उपकर्णधार गायत्री मांडवकर, मिनाक्षी जंगले, हिमांशी म्हात्रे, प्राजक्ता मते, आचल मोरे, सिद्धी कळंबटे, तेजश्री गोसावी, भूमि घुमाडे यांनी ही लढत गाजवली.

या कबड्डी संघाची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या यशस्वी संघाला शाळेचे क्रीडा प्रमुख आणि राज्य कबड्डी पंच विठ्ठल सुळे यांचे प्रशिक्षण लाभले आहे. तसंच शाळेचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचे मार्गदर्शनही या संघाला लाभले.

summary- dahisar vidya mandir won runner up in kabaddi