मेष (ARIES – friday, December 31, 2021)
महत्वाची कामे दुपारपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आहे. काही महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ मात्र वाढेल. आवडीचा पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग- आकाशी
वृषभ (TAURUS – friday, December 31, 2021)
उत्तम यश देणारा दिवस आहे. वेळ वाया दवडू नका. संध्याकाळी प्रिय जनांच्या भेटी होतील. आवडीचा सिनेमा बघायला जावंसं वाटेल. ब-याच दिवसांनी जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा माराल.
शुभरंग- पिवळा
मिथुन (GEMINI – friday, December 31, 2021)
स्पर्धेत यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन फायदा होण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या आवडीचा पोषाख परिधान करावासा वाटेल. हव्या त्या गोष्टी करायला वेळ मिळेल.
शुभरंग- अबोली
कर्क (CANCER – friday, December 31, 2021)
स्वप्ने साकार होतील. वास्तू पूर्ण होईल. मौल्यवान खरेदी होईल. तब्येतीची काळजी घ्या. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.
शुभरंग- लाल
सिंह (LEO – friday, December 31, 2021)
सध्याचा लाभदायक कालावधी आहे. प्रवासात वाहनसुख मिळेल. मौजमजा कराल. प्रिय व्यक्तींसोबत बराच वेळ घालवाल. मन मारून जगू नका.
शुभरंग- केशरी
कन्या (VIRGO – friday, December 31, 2021)
कलाकारांना यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. आनंदी दिवस आहे. चैनीवर खर्च कराल. घरातील वडीलधा-यांचे आशीर्वाद घ्या. धार्मिक कार्यात यथाशक्ती दान करा.
शुभरंग- काळा
तूळ (LIBRA – friday, December 31, 2021)
भौतिक सौख्य लाभेल. आपल्या शब्दास मान मिळेल. मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागले. कोणी केलेल्या कौतुकाने हुरळून जाऊ नका.
शुभरंग- नारिंगी
वृश्चिक ( SCORPIO – friday, December 31, 2021)
दिवसाचा उत्तरार्ध अधिक चांगला आहे. कोडी सुटतील. गूढ गोष्टी उचलू शकतात. मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करा. आवडीचे पुस्तक वाचण्यात वेळ घालवाल.
शुभरंग- जांभळा
धनु (SAGITTARIUS – friday, December 31, 2021)
विश्रांतीचा दिवस आहे. कामात अडथळे येतील. संध्याकाळी मार्ग सापडेल. अडचणी दूर होतील. सौंदर्यप्रसाधनांची खरेदी कराल.
शुभरंग- तपकिरी
मकर ( CAPRICORN – friday, December 31, 2021)
बुद्धिमता उपयोगास येईल. मानसिक सौख्य लाभेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. काही प्रसंगात इतरांचाही विचार करा.
शुभरंग- राखाडी
कुंभ (AQUARIUS -friday, December 31, 2021)
व्यसने टाळा. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी मिळेल. आवडत्या देवतेची उपासना करा. मनःशांती मिळेल.
शुभरंग : मोती
मीन (PISCES – friday, December 31, 2021)
प्रवासात ओळखी होतील. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. भ्रमंती घडेल. शक्यतो आराम करा. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील.
शुभरंग – पोपटी



























































