
मेष -( ARIES – Monday, December 6, 2021)
निरोगी शरीरात निरोगी मनाचा वास असतो. त्यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. त्यासाठी मेडिटेशन करा. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी सहकारी मदत करतील, मात्र कोणावरही रुसून राहू नका. वाहन चालवताना, प्रवास करताना काळजी घ्या. कुटुंबियांकडून कौतुक होईल.
भाग्य रंग – गुलाबी
वृषभ – (TAURUS – Monday, December 6, 2021)
दुसऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लावून घ्या. कदाचित त्याच्या ऐकण्यातून तुमची समस्या सुटू शकेल. आर्थिक टंचाईचा परिणाम मनावर होऊ देऊ नका. इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करा. जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होईल. जोडीदारावर निराश होऊ नका. नोकरीच्या कामानिमित्त केलेला प्रवास उत्साह वाढवेल.
भाग्य रंग – मोरपिसी
मिथुन – ( GEMINI Monday, December 6, 2021)
जोडीदाराला न आवडणारा पोषाख करू नका. त्यामुळे ते नाराज होण्याची शक्यता आहे. प्रवास मजेशीर पण खर्चिक होईल. सौंदर्यवाढीसाठी वेळ द्याल. त्यामुळे वेळ कसा गेला ते कळणारच नाही.
भाग्य रंग – केशरी
कर्क – (CANCER Monday, December 6, 2021)
खर्च करताना काटकसरीने करा नाहीतर खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. सहनशिलतेने परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करा. गरजवंताला मदत कराल. पाहुण्यांना घरी बोलवण्याचे नियोजन आज करू नका.
भाग्य रंग – हिरवा
सिंह ( LEO Monday, December 6, 2021)
धार्मिक कार्याला आर्थिक सहकार्य करा. दागिने किंवा गृहोपयोगी वस्तुंची खरेदी होण्याची शक्यता आहे. कोणासोबतही गुपचूप व्यवहार करू नका. मन:शांतीकरिता देवळात जा.
भाग्यरंग – जांभळा
कन्या (VIRGO Monday, December 6, 2021)
सकारात्मक विचारांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल. नोकरी-व्यवसायात नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. आज कामावर लक्ष केंद्रित केले तर भविष्यात फायदे होतील.
भाग्य रंग – नारिंगी
तूळ ( LIBRA Monday, December 6, 2021)
अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागा. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त प्रवासाची शक्यता आहे. नोकरी सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. प्रिय व्यक्तीला वेळ द्या.
भाग्य रंग – राखाडी
वृश्चिक ( SCORPIO Monday, December 6, 2021)
राग अनावर होऊ देऊ नका. कोणावरही अपेक्षा ठेवू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कौतुक करतील, तरीही भारावून जाऊ नका. आलेल्या समस्येवर शांतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागेल.
भाग्य रंग – पांढरा
धनू ( SAGITTARIUS Saturday, December 6, 2021)
मित्रमैत्रिणी थट्टा करतील. इतरांना प्रश्नाला चातुर्याने उत्तर द्यावं लागेल. आज दिवसभरात केलेल्या कामामुळे तुमची कार्यक्षमता वाढल्याचे दिसून येईल. तिऱ्हाईताकडून ऐकलेल्या गोष्टीची खात्री करून घ्या.
भाग्य रंग – काळा
मकर ( CAPRICORN Monday, December 6, 2021)
आज लोकं तुमचं अभिनंदन करतील. आजचा दिवस खूप आनंदाचा जाईल. काही समस्या सुटतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
भाग्य रंग – मरून
कुंभ (AQUARIUS Monday, December 6, 2021)
ताणतणावावर मात कराल. घरातील कर्तव्ये पार पाडावी लागतील. गुंतवणूक आणि भविष्यातील योजना गुप्त ठेवा. संध्याकाळचा वेळ पाहुण्यांसोबत घालवाल. अवेळी प्रवास करावा लागेल.
भाग्य रंग – आकाशी
मीन (PISCES Monday, December 6, 2021)
स्वत:च्या आवडीची खरेदी कराल. स्वत:चेच कौतुक करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. सहकाऱ्यांकडून टीका होऊ शकते. नव्या कल्पना सुचतील.
भाग्य रंग – पोपटी

























































