मजूर पायीच निघाले स्वगृही, पण रस्ता सोपा नाही

रोजच्या खाण्याची भ्रांत

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मजुरीसाठी परराज्यात गेलेल्या मजूरांचे चांगलेच हाल झाले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मजूर पायीच आपल्या घरी निघाले आहेत. पण त्यांचा हा रस्ता साधा सरळ नाही.

लॉकडाऊन मधील महागाई

लॉकडाऊन दरम्यान सगळ्यांना धान्य मिळणार असे आश्वासन सरकारने दिले आहे. परंतु अनेक व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवल्या जात आहेत. अनेक दुकानदार आणि व्यापार्‍यांनी लॉकडाऊनचा गैरफायद घेतला आहे. त्यामुळे गरीब मजुरांचे हाल होत आहेत. अन्न धान्यांचा पुरवठा सामान्य आहे असे जरी सरकार सांगत असले तरी खरी परिस्थिती वेगळी आहे.

घरी पोहोचल्यानंतर

घरी पोहोचल्यानंतर सगळं काही ठीक होईल असा विश्वास मजुरांना आहे. लॉकडाऊन नंतर कुणालाही घाबरण्याची गरज नाही, प्रत्येक व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत पुरेल एवढे गहू तांदूळ आणि डाळ मोफत दिल्या जातील अशी घोषणा सरकारने केली आहे. तसेच जनधन खात्यात 500 रुपये टाकले जाती असेही सरकारने म्हटले आहे. म्हणून मजूर आपल्या घरी निघाले आहेत. एकदा घरी पोहोचलो तर पुढचा विचार करता येईल असा विचार मजूर करत आहेत. बहुतांश मजुरांचे राशनकार्ड आपल्या गावी आहेत. तिथे गेल्यानंतरच अन्न धान्य आणि पैसे मिळतील.

शहरातील कुचंबना

ग्रामीण भागापेक्षा शहरात लॉकडाऊन सक्तीने पाळला जातो. कोरोनाचे बहुतांश रुग्ण हे शहरात आढळले आहेत. शहरात कामधंद्याविना राहणे हे मजुराना परवडण्यासारखे नाही. त्यात शहरात चौकाचौकात पोलीस तैनात आहेत. रस्त्यावर फिरताना आढळल्यास पोलीस मारतात. म्हणून मजुरांनी घरचा रस्ता पकडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या