गोलमाल है भय्या, दाल मे कुछ बडा काला है! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी सुप्रिया सुळेंना मोठा संशय

पुण्यातील कोरेगाव पार्कात मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. आणि यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आले आहे. पण पार्थ पवार यांच्या आत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारचा यात विषयच येत नाही अशी प्रतिक्रिया देत दाल मे कुछ बडा काला आहे असे म्हटले आहे.

दिल्लीत पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तहसिलदार आणि तलाठी म्हणतात की आम्ही सहीच नाही केली. आणि आता त्यांची नोकरी गेली आहे. हा तहसिलदार आणि तलाठ्यावर अन्याय नाही का? पार्थ पवारांचा यात विषयच येत नाही यात. हा महाराष्ट्र सरकारचा अंतर्गत विषय आहे. पार्थ पवार म्हणाले की माझे वकील यावर उत्तर देतील. पण आपल्याला महाराष्ट्र सरकार गोंधळात टाकत आहे. महाराष्ट्र सरकारची पहिली प्रतिक्रिया होती की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी आली? गोलमाल आहे. दालमे कुछ काला है. आणि ही सगळी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.