
तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी पदावरून चर्चा सुरू झाली आहे. उत्तराधिकारी तिबेटी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल, यामध्ये चीनची कोणतीही भूमिका राहणार नाही, असे लामांनी स्पष्ट केल्यानंतर चीनने दमदाटी करायला सुरुवात केली आहे. दलाई लामा यांना चीनची परवागी घ्यावीच लागेल. जोपर्यंत चीनची परवानगी घेतली जात नाही तोपर्यंत उत्तराधिकारी निवडला जाणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.