
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका तरुणाला उच्च जातीतील तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले म्हणून तिच्या घरच्यांनी बेदम मारहाण केली आहे. ते इतक्यावरच नाही थांबले तर त्यांनी त्याच्या गुदद्वारात रॉड घुसवला. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हरेंद्र कुमार (22) असे त्या तरुणाचे नाव असून त्याचे त्याच्याच गावात राहणाऱ्या एका उच्च वर्णीय मुलीसोबत अफेयर होते. त्यांच्या अफेयरबाबत मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी मुलीला कोंडून ठेवले होते.
हरेंद्र हा स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. त्यामुळे तो कायम पहाटे लवकर उठायचा व शेताजवळ अभ्यासाला जायचा. गुरुवारी पहाटे तो अभ्यासासाठी जात होता. त्यावेळी त्याने वाटेत त्याच्या प्रेयसीला भेटायचा प्रयत्न केला. तो तिच्या घराजवळ तिची वाट पाहत असताना प्रेयसीचे वडील ब्रह्मदीन व तिचे तीन भाऊ राजू, गजराज, भरत यांनी त्याला पाहिले व मारहाण करण्यास सुरुवात केली.
बेदम मारल्यानंतर त्यांनी लोखंडी ऱॉड त्याच्या गुदद्वारात घुसवला. या प्रकरणी पोलिसांनी ब्रह्मदीन, राजू व भरतला अटक केली आहे तर गजराज हा फरार आहे.




























































