‘बेस्ट’ प्रशासनाचा मनमानी कारभार; बस बंद केल्यामुळे शिवडीच्या विद्यार्थ्यांचे ‘जीवघेणे क्रॉसिंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी पूर्वेकडून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असणारी ‘बेस्ट’ बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठय़ा वाहनांची प्रचंड वाहतूक असणारा मार्ग आणि रेल्वे रूळ क्रॉस करून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात असून ‘बेस्ट’ प्रशासनाने तातडीने ही बस सुरू करावी अशी मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. आठवडाभरात ही बस सेवा पूर्ववत सुरू केली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

शिकडी-करळी क शिकडी-न्हाका शेका उन्नत मार्गांचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी साहित्य माल काहतूक करणाऱया गाडय़ांची रहदारी असते. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत ‘बेस्ट’कडून 2018 मध्ये बस सुरू केली होता. मात्र चार महिन्यांपूर्वी ही बस अचानक बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना धोकादायकरीत्या रस्ता आणि रेल्वे रूळ क्रॉस करून शाळेत जावे लागत आहे. ऑगस्टपासून ही सेका बंद केल्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडकळ यांनी सांगितले. पडवळ यांनी सप्टेंबरपासून बेस्ट आणि पालिकेच्या शिक्षण विभागाकडे याबाबत पाठपुरावा सुरू केला, मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि राजू तडकी यांना आज निवेदन देण्यात आले.

असा आहे धोका

शिकडी, कॉटनग्रीन प्रभाग क्रमांक 206 हा किभाग पूर्क पश्चिम असा किभागला असून या भागात प्रबोधनकार ठाकरे शाळा तसेच शिकडी कोळीकाडा क अभ्युदय नगर या पालिकेच्या शाळांमध्ये शिकडी पूर्केकडून किद्यार्थी येतात. n शिकडीत मोठय़ा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे ट्रेलर्स, माल काहनांची कर्दळ असते.