१३०० फुटांवर लटकलेले खतरनाक हॉटेल!

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन
दक्षिण अमेरिकेतील पेरूतील सॅक्रेड व्हॅलीत बनवण्यात आलेले ‘स्कायलॉज हॉटेल’ जगातील सर्वात उंचावर म्हणजे १३०० फुटांवर लटकलेले खतरनाक हॉटेल आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले हे हॉटेल म्हणजे एक आश्चर्यच आहे. या ठिकाणी जाण्यासाठीही अनेक आव्हाने पार करावी लागतात. त्यामुळे अशा दुर्गम ठिकाणी हॉटेल कसे उभारले असेल असा प्रश्न मनात येतो.
या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हाने पार करावी लागतात. त्यामुळे या हॉटेलमध्ये पोहोचणे हे एक अॅडव्हेंचर आहे. या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे रोप वेने या हॉटेलपर्यंत पोहचता येते. मात्र, हा प्रवास खडतर आहे. साहसी खेळाची आवड असणाऱ्यांसाठी आणि गिर्यारोहकांसाठी हा मार्ग आहे. तर दुसरा मार्ग म्हणजे डोंगराच्या कडेला बनवण्यात आलेल्या लोखंडी पायऱ्या चढून १३०० फुटांचे अंतर पार करावे लागते. या मार्गाने येताना तोल सांभाळत हॉटेलपर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान आहे.
hotel-1
हे हॉटेल कॅप्सूलच्या आकारात बनवण्यात आले आहे. २४ फूट लांब, ८ फूट रुंद आणि आठ फूट उंचीचे हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये चार बेड, एक बाथरूम आणि एक डायनिंग रुम आहे. या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे सुमारे २० हजार रुपये आहे.