
सामना ऑनलाईन । दंतेवाडा
दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी दूरदर्शनच्या क्रूवर हल्ला केल्यानंतर यामध्ये कॅमरामनचा मृत्यू झाला तर नक्षल्यांशी लढताना दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ज्यादा कुमक या भागात पाठवण्यात आली होती. त्यावेळी नक्षल्यांनी झाड्यांवर संदेश लिहून ठेवल्याचे पाहायला मिळाले.
गाँवों पर पुलिस हमलाएँ
जनता पर फर्जी मठभेडें
महिलाओं पर अत्याचार बंद करें!
भाकप (माओवादी)
दरभा डिविजन कमेटी
असा संदेश नक्षलवाद्यांनी झाडावर चिकटवून ठेवला होता. अन्य एक संदेशही असाच झाडावर लिहिला होता. पोलीस आणि सीआरपीएफचे जवान यांनी नक्षलवाद्यांविरोधात आक्रमक होत कारवाई सुरू केल्यानंतर असे हल्ले वाढले आहेत. आपली दहशत निर्माण होऊन विरोधातील कारवाया रोखण्यासाठीच हे प्रकार केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
Dantewada: #Visuals from the spot where two police personnel & a DD cameraman lost their lives in an attack by Naxals. Two security personnel injured in the attack are undergoing treatment. #Chhattisgarh pic.twitter.com/ymo1sLWOTd
— ANI (@ANI) October 30, 2018



























































