घरोघरी दिवे लावा, देवबंदचे मुस्लिमांना आवाहन

2661

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 9 वाजता घरात दिवा, मेणबत्ती, टॉर्च आणि मोबाईल फ्लॅश लावण्याचे आवाहन केले आहे. या निमित्ताने आपल्यात एकजूट दिसेल असे पंतप्रधान म्हणाले. देवबंदचे मौलाना कारी राव यांनी पंतप्रधान मोदींचे समर्थन करत मुस्लिमांनीही घरात दिवे लावावे असे आवाहन केले आहे.

मौलाना कारी राव म्हणाले की, आमचे मुस्लिम भाऊ दररोज घरी कुराण वाचतात, देशासाठी प्रार्थना करत आहेत आणि रोजाही ठेवत आहेत. त्यामुळे अल्लाह आपल्याला या संकटापासून वाचवेल.” पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला मौलवी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मुस्लिम बांधवांनीही रात्री दिवे, मोबाईल फ्लॅश सुरू करून एकजूट दाखवावी असे आवाहन मौलाना राव यंनी केले आहे.

दिल्लीच्या तबलिगी जमात मरकजमध्ये जे लोक सामील झाले होते त्यांनी बाहेर येऊन चाचणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांनी सरकारला घाबरण्याचे कारण नाही. यातच त्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे भले आहे असेही मौलवींनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या