
शिवसेना नेते सुभाष देसाई, राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर व अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवन येथे दर्यापूर येथील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात जाहीररीत्या प्रवेश केला. यावेळी माजी पंचायत समिती दर्यापूर व माजी जिल्हाध्यक्ष भारिप अमरावती सतीश काळे, पुरुषोत्तम रायबोले, मनीष राणे, रोशन ठाकरे, गजानन ठाकरे, अनिल काळे, हरिदास ठाकरे, राजू धांडे, प्रमोद लोणकर, प्रसाद लाजूरकर, अक्षय लाजूरकर, कळाशी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे, राजेश राणे, गौरव आवारे, हेमंत राणे, अमोल राऊत, निवृत्ती साखरे यांनी प्रवेश घेतला. प्रवेश घेतेवेळी सुनील पाटील डिके, गणेशराव लाजूरकर, योगेश बुंदे, नीलेश पारडे, मोहन बायस्कार, राजेश बायस्कार, मंगेश बोरकर, अमोल बायस्कार, शुभम पारडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



























































