दसरा वाहन नोंदणीला मंदीचा फटका, केवळ 298 वाहनांची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसऱयाच्या शुभमुहूर्तावर वाहनांची नोंदणी करून ते घरी नेण्याची प्रथा असते. यंदा मुंबईतील आरटीओ कार्यालयात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची नोंदणी झाल्याने ऑटो क्षेत्रातील मंदीची झळ बसल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चारही आरटीओतून 608 वाहनांची नोंदणी झाली होती, तर यंदा दसऱयाच्या मुहूर्ताला आरटीओत केवळ 298 वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी  310 वाहनांची नोंदणी कमी झाली आहे.

वडाळा आरटीओत गेल्या वर्षी दसऱयाच्या मुहूर्तावर 199 नव्या वाहनांची नोंदणी झाली होती. त्यातून सरकारच्या तिजोरीत 96 लाख 36 हजार 185 रुपयांचा महसूल मिळाला होता. याउलट या वर्षी वडाळा आरटीओत केवळ 42 वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून सरकारला केवळ 9 लाख 7 हजार 434 रुपयांचा महसूल मिळाला आहे. ताडदेव आरटीओमधील वाहन नोंदणीत मात्र काही प्रमाणात वाढ दिसून आली. ताडदेव आरटीओत गेल्या वर्षी 33 वाहनांची नोंदणी  झाली आहे. ताडदेव आरटीओमध्ये आज 41 वाहनांची नोंदणी झाली होती. तर अंधेरी आरटीओत गेल्या वर्षी अंधेरी 81 वाहनांची नोंदणी झाली होती, तर यंदा केवळ 18 वाहनांची नोंदणी झाली आहे.

महसुलातसुद्धा घट

2018                  2019

अंधेरी – 74, 30, 318       12,38,459

वडाळा – 96,36,185        90,74,34

ताडदेव – 33,34,141       15,89,353

दसऱयाच्या दिवशी वाहन नोंदणी  

आरटीओ 2018 2019

अंधेरी           81         18

वडाळा 199         42

ताडदेव 33         41

बोरिवली 295         197

एकूण       608        298