श्री दत्त मंदिरात म्हटल्या जाणाऱ्या करुणात्रिपदीची जन्मकथा

>> निळकंठ कुलकर्णी

श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ‘मनोहर पादुका’ कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तचे हे अतीव प्रेमादाराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवाची सर्व पद्धती आणि आचारसंहिता नियमावली स्वतः प .श्री टेंबे स्वामींनीच घालून दिली आहे. त्यानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी येथे श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.

इ.स 1905 मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना पुजारी गुंडोपंत खोबरे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी प्रचंड घाबरले. त्यावेळी प. प. श्री टेंबे स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी ( नामदेव ) येथे चातुर्मासनिमित्त मुक्कामाला होते. पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. त्यांच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प.प.श्री टेंबे स्वामी ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी दत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ठ होऊन म्हणाले “तू घालून दिलेल्या नियमानुसार हे लोक वागत नाहीत. पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालात आहेत, तुझी निंदा करतात. आम्हालाच तेथे राहण्याचा कंटाळा आला आहे. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी!” ध्यानातून उठल्यावर प.प.श्री टेंबे स्वामी महाराजांनी रोषाने सांगितले की, “जर दुर्वर्तन सुधारून जर श्रींची योग्य प्रकारे सेवा करणारे नसाल तर काय भयंकर परिणाम होतील, ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही वर्तन सुधारल तर ठीक आहे, तुम्ही जाणे नाहीतर तुमचं देव जाणे!

पुजाऱ्यांनी हात पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे. त्याबरहुकूम करण्याची सेवा करण्याची हमी दिल्यावर प.प.श्री टेंबे स्वामींना कळवळा आल्यावर त्यांनी श्री दत्तप्रभूंना प्रार्थना केली. त्यावेळी त्यांनी करुणात्रिपदी रचून ती दररोज म्हणायची पद्धत घालून दिली.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या