‘लपवा छपवी’ रंगभूमीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटानंतर नाट्यसृष्टी उभी राहत आहे. कठीण काळात नाट्यनिर्मिती करणारी संस्था म्हणजे दत्तविजय प्रोडक्शन आणि त्या संस्थेची धुरा वाहणारे नाट्यनिर्माते म्हणजे दत्ताजी घोसाळकर. गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे भाऊ अरविंद घोसाळकर हा नाटकाचा वारसा पुढे चालवत  नवंकोरं दोन अंकी विनोदी नाटक ‘लपवा छपवी’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘लपवा छपवी’ चा शुभारंभ 7 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे आणि 8 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता आचार्य अत्रे, कल्याण येथे होणार आहे. नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. प्रदीप वेलोंडे, रविना भायदे, नंदू जुवेकर, हर्षा महाजन, पल्लवी पदारे आणि भूषण घाडी यांच्या भूमिका आहे.