दाऊदच्या 13 प्रॉपर्टींचा होणार लिलाव, रत्नागिरीतील लिलावाकडे लक्ष्य

846

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीवर टाच येऊन लवकरच त्यांचा लिलाव होणार आहे. दाऊदच्या या सर्व संपत्ती त्याच्या मूळगावी रत्नागिरीत असून त्यांची संख्या 13 इतकी आहे.

साफेमा कायद्यानुसार जानेवारी अखेरपर्यंत दाऊदच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. त्यात आंब्याच्या बागा, शेती, पेट्रोल पंप आणि दुमजली बंगल्यांचा समावेश आहे. प्रशासनाने दाऊदच्या सर्व संपत्तीची मोजदाद केली आहे परंतु त्यांची किंमत अजून न ठरवल्याने या कार्यवाहीला थोडा वेळ लागत आहे. गेल्या महिन्यात इक्बाल मिर्चीच्या संपत्ती लिलावात काढल्या होत्या. परंतु त्या विकल्या गेल्या नाहीत. संपत्तींची किंमत बाजारभावापेक्षा जास्त असल्याने त्या विकल्या न गेल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

दाऊदच्या मालकीचा बंगला त्याचे वडील इब्राहिम कासकर यांनी बांधला होता. या पूर्वी प्रशासहाने दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा नागपाड्यातील 600 स्के.फूटचा बंगला विकला होता. लिलाव त्या बंगल्याला एक कोटी 80 लाख रुपये किंमत मिळाली होती.

गेल्या वर्षी प्रशासाने दाऊदचा भेंडी बाजारातील अमिना बंगला विकला होता. त्याची किंमत 79 लाख 43 पासून सुरू झाली होती. तेव्हा सैफी बुर्‍हाणी विकास ट्रस्टने तो साडीतीन कोटीत विकत घेतला होता. या ट्रस्टने दाऊदच्या कुटुंबीयांच्या मालकीचा शबनम गेस्ट हाऊस, धरमवाला इमारतीतील सहा फ्लॅट आणि रौनक अफरोज हे हॉटेलही लिलावात विकत घेतले होते.

आपली प्रतिक्रिया द्या