खासगी जमिनीवर पेट्रोल पंप, गॅस स्टेशन सुरू करण्यास परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल पंप किंवा CNG स्टेशन सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. खासगी जमिनीवर पेट्रोल पंप किंवा सीएनजी स्टेशन सुरू करण्यास DDA ने परवानगी दिली आहे. नियम बदलामुळे जमीन वापर बदलाचे शुल्क मोजून खासगी जमीन मालक या कामासाठी वापरू शकतो.

यापूर्वी या दोन गोष्टींसाठी जमीन मिळवायची असल्यास दिल्ली विकास प्राधिकरण म्हणजेच DDA कडे अर्ज करावा लागत असे. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला ती जमीन भाड्याने दिली जात होती. ज्या जमिनींसाठी इंधन कंपन्यांना रस होता, त्या डीडीएकडे उपलब्ध नव्हत्या. ज्या ठिकाणी डीडीएच्या जमिनी उपलब्ध होत्या त्या ठिकाणी कंपन्यांना व्यवसाय वृद्धीसाठी आशेचा कोणताही किरण दिसत नव्हता. यासाठी डीडीएने नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

खासगी जमीन मालकांना डीडीएकडे जमिनीचा वापर बदलण्यासाठीचे शुल्क भरावे लागणार आहे. जर जमीन मालकाने त्याच्या जागेवर CNG स्टेशनसह ई-चार्जिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला तर त्याला शुल्कामध्ये 95 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. डीडीएने घेतलेला हा निर्णय तिथल्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येशी मुकाबला करण्यासाठी घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. या निर्णयामुळे CNG स्टेशन वाढतील आणि त्यामुळे त्यावर धावणाऱअया गाड्यांची संख्याही हळूहळू वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.