किनी यल्लादेवी शिवारात आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनीधी । वाढवणा

येथुन जवळच असलेल्या किनी यल्लादेवी शिवारातील गणपतराव रडगिरे यांच्या शेतात रविवारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्यांचे नाव उदयकुमार नामदेवराव घोणसे (वय ५०) आहे.

पराग उदयकुमार घोणसे (वय २२) रा. किनी यल्लादेवी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवणा येथे आणले आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळाले नसून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गफ्फार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शिवाजी बेल्लाळे हे करीत आहेत.